कौसल्या विनवि जना ॥ झणी घेउन या रामा ॥धृ०॥
दूध कुणा देवू ॥ गंध कुणा लावू ॥
कवणाते मी भरवू ॥ मन्मनविश्रामा ॥ कौ०॥१॥
मधुर सुवासाचे उदक तुला कैचे ॥
मोडतिरे बाभळिचे कंटक पदपद्मा ॥कौ०॥२॥
किरिट काय केला, वल्कले का तुजला ॥
कैकइच्या वचनाला पाळिसि घनशामा ॥कौ०॥३॥
रथ धाडुन त्याला, अणवा मम बाळा ॥
कृष्णेच्या मनि बसला रामनाम प्रेमा ॥कौ०॥४॥