मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
उद्धवास क्षेम पुसे यशोदा ...

मानसगीत सरोवर - उद्धवास क्षेम पुसे यशोदा ...

भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.


उद्धवास क्षेम पुसे यशोदा सती ॥

असति सुखी रायकृष्ण सांग मजप्रती ॥उद्ध०॥धृ०॥

धरून पायि हरिस इथे नाहु घातले ॥

घेउन कडे कवल करी यास भरविले ॥

गीत गात पालकात बाळ निजविले ॥

मृत्तिका तो भक्षिता मि मारिले किती ॥उद्ध०॥१॥

अरुण उदयि धेनुसंगे धाडिला वनी ॥

गार्‍हाणी गोपिकांचे सत्य मानुनी ॥

हरिस उखळि बांधियले आठवे मनी ॥

त्रिभुवनि मज सम हि नसे अन्य माय ती ॥उद्ध०॥२॥

नंदअंगणात गोपि येति धाउनी ॥

उद्धवजी निरोप असा सांग जाउनी ॥

खरिद कुठे केलि हरी नवरि पाहुनी ॥

झालि कशी तुजसि अता कुबडि अवडती ॥उद्ध०॥३॥

कुंजवनी कृष्णनाथ रास खेळता ॥

भाषदान देउनिया करिसि का वृथा ॥

जाय तुझा थोरपणा श्रीहरी आता ॥

कर जोडुन कृष्णा त्या झालि विनविती ॥उद्ध०॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 30, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP