मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
अजि सुदिन उगवला ॥ नयनि ...

मानसगीत सरोवर - अजि सुदिन उगवला ॥ नयनि ...

भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.


अजि सुदिन उगवला ॥

नयनि राम पाहिला ॥

पतिशापे दिवस अमित ॥

मम तनु जड दगड होत ॥

चरणधुळी वरि पडत ॥

तारिले मला ॥नयनि०॥१॥

पाप नष्ट व्हावयार्थ ॥

रामनाम वालि जपत अति अजामीळ स्मरत ॥

पुनित जाहला ॥ नयनि०॥२॥

विधि तनया प्रार्थि राम ॥

सुदृढ धरि ह्रदयि प्रेम ॥

करुनि शुभ्र मन कुसुम पूजिते तुला ॥नयनि०॥३॥

मम अंतर संदुकेत ॥

म्हणे कृष्णा बैस त्वरित ॥

जावु नको पुरवि हेत ॥ वारि भवजला ॥नयनि०॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 30, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP