कीर्तनी स्मरणी अर्चनी भावे ॥ रघुवीरा भजे ॥धृ०॥
क्षणभंगुरतनु क्षणिक सुखी ह्या भुलुनि म्हणसि का माझे माझे ॥रघु०॥१॥
बुडसी वृथा का भवसागरि ह्या, धन सुत स्त्रीचे वाहसी ओझे ॥रघु०॥२॥
बघुनि अशा ह्या श्यामस्वरूपा, तन मन अर्पुनी चरणी लागे ॥रघु०॥३॥
हलाहल शीतल झाले शिवाचे, कंठी भूषण सुंदर साजे ॥रघु०॥४॥
गुरुपदी भावे शिर वाहुनि हे, कृष्णा रामा नामी गाजे ॥रघु०॥५॥