मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
गायत्री , सावित्रि , सरस्...

मानसगीत सरोवर - गायत्री , सावित्रि , सरस्...

भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.


गायत्री, सावित्रि, सरस्वति तारि तारि मजला ॥

ये संध्या देवी धरिते पदकमला ॥ गायत्री०॥धृ०॥

अरुणोदयि रवि मंडळि बाला अससि लालरंगी ॥

हंसवाहिनी चतुर्भुजा तू तिलक लालरंगी ॥

लाल पितांबर लाल अभरणे उटी लालरंगी ॥

अधिष्ठान तव भूलोकासी मुकुट लालरंगी ॥

दंड कमंडलु करि रुद्राक्षमाळ लालरंगी ॥

ब्रह्म देवतेला, जप ऋग्वेदाला ॥गायत्री०व१॥

माध्यान्हीसी रवी तरुण तू शुभ्र अंग सारे ॥

प्रति वदनासी त्रिनेत्र असती चतुराननधारे ॥

रुद्र देवता यजुर्वेद जप करिसी अति अदरे ॥

शुभ्र वृषभवाहिनी बैससी कटी शुभ्र चीरे ॥

दिससि सुशोभित शुभ्र लेपनी शुभ्र अलंकारे ॥

भुवर्लोकि राहसी शोभते चंद्रबिंब गोरे ॥

भाळि तुझ्या ते, चतुर्भुजे मम चुकवी भव फेरे ॥

खट्‌वांग त्रिशूला खड्‌ग डमरु धरिला ॥गायत्री०॥२॥

सायंकाळी रविसह वृद्धा सर्वांगी श्यामा ॥

श्याम अभरणे, श्याम पितांबर, सरस्वती नामा ॥

प्रसिद्ध अससी शंख चक्र आणि धरिसि गदा पद्मा ॥

विष्णुदैवते गरुडवाहनी पूर्ण करी कामा ॥

सामवेद जप अधिष्ठान तव स्वर्लोकी धामा ॥चाल॥

लावि श्याम उटिला ॥ हरि मम त्रिगुणाला ॥गायत्री०॥३॥

ह्या संध्येचे ध्यान करिता ॥ सर्व पाप जाई ॥

त्रिकाल इजला जपतो नर जो पूर्णकाम होई ॥

ह्या देवीते प्रसन्न करिता ज्ञान तया येई ॥

यास्तव प्रसिद्ध गीतसरोवरि केले लवलाही ॥

इजसि वर्णिता शेष वेद अणि शास्त्रे शिणली ही ॥

तेथे मंदमती ही कृष्णा गुण कैसे गाई ॥

परि अवचित गुरुने ध्यान-बोध केला ॥गायत्री०॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 30, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP