खरे सौख्य सांगे मला रामराया ॥
दूर शंका करी प्राणसखया ॥धृ०॥
सगुण मूर्ती भजू निर्गुणाते पुजू ॥
कवण कार्या रिजवु नष्ट काया ॥खरे०॥१॥
तीव्र तप आचरू, दान धर्मा करू ॥
तीर्थ यात्रा फिरू सौख्य पाहया ॥खरे०॥२॥
कलियुगी ना दिसे, साधुसंतहि असे ॥
मन हे भीतसे शरण जाया ॥खरे०॥३॥
भाव-भक्ति घरि, नाम-जप अंतरी ॥
आनंदाते वरी भक्तराया ॥खरे०॥४॥
शाम हे सुंदरा, जानकीच्या वरा ॥
बैस कृष्णांतरा याचि समया ॥खरे०॥५॥