मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
उलट न्याय तुझा ॥ अरे हरी...

मानसगीत सरोवर - उलट न्याय तुझा ॥ अरे हरी...

भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.


उलट न्याय तुझा ॥ अरे हरी ॥

होशि कशाला त्रिभुवनराजा ॥धृ०॥

असत्याते बक्षिस देशी ॥

सत्यवान तो जातो फाशी ॥

न्याय नसे हा अनीति समजा ॥ उ०॥१॥

कुलिन सतीते निंदित जग हे ॥

छी, थू करिती देवा बघ हे ॥

वंदिति नर त्या जारिणिबाजा ॥उ०॥२॥

पाच त्यागुनी कांचही घेती ॥

रक्षुनि शिंपा दवडिति मोती ॥

अमृत त्यागुनि प्राशिति गांजा ॥उ०॥३॥

धर्म नीति ही सकळ उडाली ॥

वसुंधरा ही पापे बुडाली ॥

तव कलि मंत्री करितो काजा ॥उ०॥४॥

मौन धरुनिया जग चालविसी ॥

उडदासंगे बरड चिरडिशी ॥

कष्टति म्हणुनी सात्विक तनु ज्या ॥उ०॥

कृष्णा प्रार्थी ऐके सदया ॥

त्यजि निष्ठुरता कोमलह्रदया ॥

ये ऐकुनी धावा माझा ॥उ०॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : December 30, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP