रामनाम बहु गार मनूजा रामनाम बहु गार ॥धृ०॥
अगणित पापे करुनी वाल्मिक नामे झाला पार ॥मनूजा ॥राम०॥१॥
अंती स्मरता अजामीळ तो होउनि गेला स्वार ॥मनूजा॥राम०॥२॥
चंद्रमौलिने ग्रंथ वाटिला कंठी धरिले सार ॥मनूजा॥राम०॥३॥
नामप्रतापे हनुमंताने केला वनि संहार ॥मनूजा॥राम०॥४॥
रामनाम पी मधुर सुधारस दे सोडुन संसार ॥मनूजा॥राम०॥५॥
गुरुचरणांबुजि रत दिन-रजनी नमिते कृष्णा नार ॥मनूजा॥राम०॥६॥