सदोदित रामपदी राही ॥
राम पदी राही ॥
नरा तू रामपदी राही ॥धृ०॥
व्यासमुखीचे भागवतामृत प्राशुनिया पाही ॥
नरा तू प्रा० ॥१॥
वाल्मिकि-मुखिंचा ग्रंथतरू हा मधुर फळे खाई ॥
नरा तू म०॥स०॥२॥
भक्तासाठी रूपे धरितो, शरण तया जाई ॥
नरा तू श०॥स०॥३॥
श्रीरामाच्या रूपी रमली ही कृष्णाबाई ॥सदो०॥४॥