मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
बुद्धि माता शिकवी मना , स...

मानसगीत सरोवर - बुद्धि माता शिकवी मना , स...

भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.


बुद्धि माता शिकवी मना, सोडि वासना, दिवारजनी ॥

निःसंग विचर भुवनी ॥धृ०॥

हा प्रपंच लटिका खरा, मानुनी बरा, होसि घाबरा, घडोघडी ॥

तव पदी मोहवेडी ॥

धन-सुता,मानुनी वृथा, धरी क्रूरता, शरण जाई ॥

गुरुपदी देह वाही ॥

धरि छंद, त्यजुनि भवबंध, नको संबंध, मना तुजसी ॥

व्यर्थ रे व्यर्थ फससी ॥चाल॥

धाउ नको मना तू असा, अरेअसा ॥

षड्रिपू पारधी ससा, तू ससा ॥

गळा फास बांधितिल कसा, अरे कसा ॥

ती गाठ, असे बळकट, नसे तुज वाट, कुठे भुवनी ॥

पाहि मना ज्ञान नयनी ॥बुद्धि०॥१॥

नवविधा भक्तिचे मिसे, लागो तुज पिसे, कळो आधी ॥

करि त्याग सकल व्याधी ॥

नसे अंत वर्णिती संत, पंच कोशात, बघे मुळिंचा ॥

निर्गुण ब्रह्मकुळिंचा ॥

ते स्थळ, असे निर्मळ , नको करू वेळ, निघे अता ॥

नाहि तिथे क्लेश चिंता ॥चाल॥

ही माया जारिण खरि, अरे खरी ॥

नाचवी तुला बहु परी, बहु परी ॥

आलिंगुनि म्हणसि सुंदरी, सुंदरी ॥

तन मन, करुनि अर्पण, नसे तुज भान, मना काही, मना० ॥

का बुडसि नरक डोही ॥ बुद्धि०॥२॥

रामदास होइ तू खास, करी वनि वास, स्मरुनि त्यासी ॥

लाभेल सौख्यराशी ॥

हे चित्र, लावुनी नेत्र, बघे एकत्र, गाइ साचे ॥

जाईल कर्म मुळचे ॥

नाही तुटत, नाहि हे फुटत, नाही हे कुटत, बहू कुटिता ॥

नाहि पापि ह्यासि बघता ॥चाल॥

भाव वारू, घेउनि जा, अरे जा ॥

रम्य स्थल तेथिचे पहा, अरे पहा ॥

नाशवंत तनू त्या वहा, त्या वहा ॥

करुनिया प्रपंची आशा, अशी तुझि दशा मना झाली ॥

सांग संगे कोण आली ॥बुद्धि०॥३॥

नाही कळत, नाही हे वळत, नाही हे मिळत, अभक्तासी ॥

घे त्वरे ज्ञानराशी ॥

नाही पडत, नाही हा दडत, नाही हा झडत, कदा काळी ॥

हा वृक्ष सदा सुफळी ॥

नाहि भिजत, नाहि हे थिजत, नाहि हे विझत विझू जाता ॥

अतर्क्य ह्याचि वार्ता ॥चाल॥

नाही दिसत ज्ञानि हे वसे ॥ अरे वसे ॥

आदि अंत मध्य त्या नसे ॥ त्या नसे ॥ ते मना पाहि तू कसे, तू कसे ॥

कृष्णांतरि स्थिर हो मना, बघे निर्गुणा, विषय त्यजुनी ॥

हेचि शिकवि बालका जननी ॥बुद्धि०॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 30, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP