घ्या, घ्या, घ्या, घ्या, घ्या, झणी ॥
रामनामघुटका ॥धृ०॥
वारिल भव वेथा ॥ वारिल निज चिंता ॥
दंडिल हा सूर्यसुता करिल तुमचि सुटका ॥घ्या०॥१॥
रक्षिल भक्तांसी, दंडिल द्ष्टांसी ॥
दवडु नका काळासी फुकट एक घटिका ॥घ्या०॥२॥
नामामृत आधी ॥ पिउनि हरलि व्याधी ॥
कृष्णेच्या ह्रदयि कधी, भाव नसे लटिका ॥घ्या०॥३॥