मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
धाव धाव गुरूवरा भवनदीत बु...

मानसगीत सरोवर - धाव धाव गुरूवरा भवनदीत बु...

भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.


धाव धाव गुरूवरा भवनदीत बुडतसे ॥

तरावयास कर्णधार रामनाम दे रसे ॥धृ०॥

औट हत्त नाविका हि समुळ वहात जात की ॥

उठति लहरि स्थूल क्रूर वासनादि घातकी ॥धाव०॥१॥

धीवर मना ओढि तिला क्रोध नक्र मत्त तो ॥

वैराग्या तीव्र धरी वधि विवेक पाशि तो ॥धाव०॥२॥

बघुनि भाव सदय राव घेइ धाव करि त्वरा ॥

मोहपूरित या नदीत फिरत मृत्यु भोवरा ॥धाव०॥३॥

आधिवात सुटुनि तयाजवळि नेत नाव रे ॥

अल्प अवधि भरत आयु म्हणुनि गुरू धाव रे ॥धाव०॥४॥

सदय ह्रदय करुनि शिरी कृपाकराहि ठेवि तू ॥

पंचकोशी वास करी रूप मला दावि तू ॥धाव०॥५॥

जाइल घडी होइल हनी सत्वनाश गुरुवरा ॥

कृष्णि भ्रमरि प्रार्थि सदा दावि मार्ग लेकरा ॥धाव०॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : December 30, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP