हरि रे तुझी मुरलि किती गुलजार ॥धृ०॥
पाका करिता पळत मि सुटले टाकुनि उघडे द्वार ॥ह०॥१॥
न्हाणित नाहता धावत आले पाठिवरी कुंतलभार ॥ह०॥२॥
तान्हयास मी ढकलुनि दिधले भांबवि तो नंदकुमार ॥ह०॥३॥
शुक बक मैना वृक्षि स्थिरावली मुरलिरव अनिवार ॥ह०॥४॥
ऐशा कृष्णापदि कृष्णा ही मागतसे आधार ॥ह०॥५॥