मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
बाई कैसे दत्तगुरू पाहिले ...

मानसगीत सरोवर - बाई कैसे दत्तगुरू पाहिले ...

भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.


बाई कैसे दत्तगुरू पाहिले ॥

कृष्णातिरि औदुंबरि राहिले ॥धृ०॥

दंड-कमंडलु हाती ॥ अंगी चर्चुनि विभुती ॥

पायि पादुका घालुनिया चालिले ॥बाई०॥१॥

उदकपात्र हाती धरुनी ॥ भक्त येती ओलेत्यानी ॥

कोणि प्रभुच्या नामस्मरणी गुंगले ॥बाई०॥२॥

पंचामृती पूजनासी ॥ भक्त येती माध्यान्हासी ॥

नैवेद्यासि पक्व अन्न आणिले ॥बाई०॥३॥

फल तांबूल अमूप ॥ प्रदक्षिणा धूप दीप ॥

कोणी लोटांगण घालू लागले ॥बाई०॥४॥

संध्याकाळी धूपारती ॥ गर्दी पालखीच्या भोवती ॥

तेहतीस कोटी सुर पाहू पातले ॥बाई०॥५॥

काशीमध्ये स्नान करि ॥ भिक्षाटन करवीरी ॥

माहुरपुरि निद्रेलागी चालिले ॥बाई०॥६॥

काय वर्णू तेथिल महिमा ॥ नाही द्यावयासी उपमा ॥

कृष्णा म्हणे अल्पमती गाइले ॥बाई०॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : December 29, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP