दुष्ट ही कैकयी कारण झाली गोवूनी पतिवचना ॥
बाइ माझा रघुवीर जातो वना ॥
रघुवीर जातो वना, आज माझा रघु० ॥धृ०॥१॥
भरजरी पीतांबर सोडुन ती ॥
काढूनी घे भूषणा ॥ बाइ०॥२॥
सर्वांगासी चर्चुनी विभुती ॥
चंदनउटि लावीना ॥बाइ०॥३॥
जनकसुतेसी रथि बैसवितो ॥
संगे घे लक्ष्मणा ॥बाइ०॥४॥
साखर केशर घालुनि आता ॥
देऊ मी दूध कुणा ॥बाइ०॥५॥
या भवडोही दुःखित कृष्णा ॥
सोडवी रघुनंदना ॥बाइ०॥६॥