गो-ब्राह्मण कैवारी ॥
मूढा मानवा भज श्रीहरी ॥धृ०॥
तेहतीस कोटी सुर सोडवीले ॥
रिस-वानर हाती दैत्य वधीले ॥
मारुनी रावण भारी ॥
स्थापीला बिभिषण लंकानगरी ॥गो०॥१॥
सांगे वसुदेव-सुत पंडू-कुमरा ॥
नित्य मी पुजितो विप्र देव्हारा ॥
इतरा कोण विचारी ॥
शुद्ध सत्वांश हे अवतारी ॥गो०॥२॥
कृष्णरूप जाणे ही विप्रप्रतिमा ॥
निंदिसि जरि तू वर्णोत्तमा ॥
यातनया याम्य-नगरी ॥
हो सावध सावध अंतरी ॥गो०॥३॥
शंखचक्रेशा शुद्ध सत्वांशा ॥
दीनदयाघना रक्षिसी दासा ॥
चरणी सिंधुकुमारी ॥
विलसे श्रीवत्सलांछन ऊरी ॥गो०॥४॥
तुजवाचुनि मज कोणी असेना ॥
भूमंडळावरी अन्य दिसेना ॥
हा भवताप निवारी ॥
नमिते कृष्णा श्रमली संसारी ॥गो०॥५॥