मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
कौसल्या विनवि श्रीरामा नक...

मानसगीत सरोवर - कौसल्या विनवि श्रीरामा नक...

भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.


कौसल्या विनवि श्रीरामा नको जाऊ वनवासाते ॥धृ०॥

काननी न मिळे बाळा उष्णोदक तुज स्नानाते ॥

मुक्तहार सांडुनि कैसे रुद्राक्षा धरिसि गळ्याते ॥

चंदनउटि त्यागुनि रामा लाविसी भस्म अंगाते ॥चाल॥

वल्कले कठिन नेसोनी ॥ हा रत्‍नमुकुट त्यागोनी ॥

शिरि जटाभार अवळोनी ॥ अनवाणी जासि वनाते ॥कौ०॥१॥

पाळिले वचन सवतीचे मी माता तुज नच वाटे ॥

सापत्‍न खरी मानुनिया कानना जासी नेटे ॥

सुकुमारा जनकजामाता कोमल पदि मोडति काटे ॥चाल॥

म्हणे मंद वाहे समीरा ॥ दे अमृत रामा चंद्रा ॥

दृष्टिचा बांध करि दोरा ॥ औषधी देत सांगाते ॥कौ०॥२॥

लागता तृषा श्रीरामा जल आणुनि गंगे देई ॥

बहु क्षुधित राम जरि भूमी फलभारे सुशोभित होई ॥

तव वंसि जन्म रामाचा चंडांशू तप्त न राही ॥चाल॥

हे वत्स धेनु हंबरते ॥ ही पक्षिण किलबिल करिते ॥

पाडसा हरणि मोकलिते ॥ आलि मूर्च्छा कौसल्येते ॥कौ०॥३॥

जुंपिता वारुसूमंते जन सकलहि फोडित हाका ॥

बंधूसह रथि बैसुनिया रघुनंदन प्रार्थी लोका ॥

गुरुचरण वंदुनी विनवी सांभाळा जननी-जनका ॥चाल॥

शरणागत कृष्णाबाई ॥ वाहते भवजल डोही ॥ श्रीरामा तारू होई ॥

ने सत्वर पैल तिराते ॥कौ०॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 30, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP