भीमातटिची माय विठाई ॥
एक विटेवरी तिष्ठत राही ॥ भीमा ॥धृ०॥
किति कनवाळू पूर्ण दयाळू ॥
या मायेते आप-पर नाही ॥भी०॥१॥
जनाबाइचे दळण दळूनी ॥
चंद्रभागेतटि लुगडी धूवी ॥भीमा०॥२॥
सखूबाइची सवत जाहली ॥
पतिसेवेसी तत्पर राही ॥भीमा०॥३॥
नाथासंगे पाणि वाहिले ॥
कावड स्कंधी घेउन जाई ॥भीमा०॥४॥
अंत नको मम पाहू आता ॥
हे जगजननी नमि कृष्णा ही ॥ भीमा०॥५॥