मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
ये धावत माय विठाई ॥ दास...

मानसगीत सरोवर - ये धावत माय विठाई ॥ दास...

भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.


ये धावत माय विठाई ॥

दासीची घ्यावि मिठाई ॥धृ०॥

संसृतिच्या विराट नगरी ॥

देह दुकान कल्पुनि नारी ॥

वैराग्य धरुनि अंतरी ॥

भाव सौदा घ्या श्री हरी ॥

प्रार्थिते मूढ वैखरी ॥

दोन्हि पाणि जोडुनि अदरी ॥चाल॥

लाभ-हानि फळे ही दोन ॥

खवासाखरमिश्रित करुन ॥

बनविले पेढे बहु छान ॥

वेलदोडे शांति ये ठाई ॥ ये धावत०॥१॥

शर्करा भक्तिचा पाक ॥

ज्ञान नारळ आणिला एक ॥

मिळवूनि बोध-विवेक ॥

बनविली बर्फि बहु चोख ॥चाल॥

सुख दुःख पारडे अणिले ॥

मनकंटकि स्थिर म्या केले ॥

हरिचरणि प्रेमे अर्पीले ॥

वासना विरो या ठाई ॥ये०॥२॥

हा जीव मुळीचा कोरा ॥

वरि वेष्णन माया दोरा ॥

अंधार पडे अंतरा ॥

करि प्रकाश बा गुरुवरा ॥

दाखवी परात्परपरा ॥

वेड लागले या भ्रमरा ॥चाल॥

नाम पैका देउनि मजला ॥

देह दुकानी या विठ्ठला ॥

भाव भक्ति पेढे-बर्फीला ॥

भक्षुनी मुक्ति मज देई ॥ये०॥३॥

नउ द्वारि दुकानी वाट ॥

हलवाइ जीव हा धीट ॥

अठरा चार करिति बोभाट ॥

साहांनी वाजविलि घाट ॥

वर्णिले रूप वीराट ॥

परब्रह्म विटेवरि नीट ॥चाल॥

पाहूनि पंढरीरचना ॥

तद्र्प जाहली कृष्णा ॥

लुब्धली विठ्ठलचरणा ॥

दे असरा आपुल्या पायी ॥ये० ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 30, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP