मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
तुज कृष्णे अधि नमिते शांत...

मानसगीत सरोवर - तुज कृष्णे अधि नमिते शांत...

भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.


तुज कृष्णे अधि नमिते शांतवाहिनी ॥

गुणसरिते भवहरिते पापनाशिनी ॥तुज०॥धृ०॥

स्नान तुझ्या जळि करिते ॥

ध्यान तुझे मनि धरिते ॥

षड्‌विकार झणि हरि ते ॥

त्रिगुण त्यागुनी ॥तुज०॥१॥

पाहुनि तव वेग रूप ॥

हरिले मम त्रिविध ताप ॥

चुकलि जनन मरण खेप ॥

भासते मनी ॥तुज०॥२॥

कुणि जाती इंद्रपदी ॥

कुणि म्हणति मोक्ष अधी ॥

साधु शीघ्र स्नान-विधि ॥

करुनिया क्षणी ॥तुज०॥३॥

मंत्र-क्रिया-भक्तिहीन ॥

करु कैसे तव मी ध्यान ॥

म्हणे कृष्णा देइ ज्ञान ॥

जननि मज झणी ॥तुज०॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 30, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP