एकपाद गालवासन *
प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.
(चित्र क्र.४३१ आणि ४३३)
एकपाद म्हणजे एक पाय. गालव हे एका ऋषीचे नाव.
पध्दती
१. सालंब शीर्षासन २ (चित्र क्र. १९२) करा.
२. श्वास सोडा. उजवे पाऊल डाव्या मांडीच्या मुळाशी ठेवून अर्धपद्मासन करा. दोन्ही पाय जमिनीशी समांतर होईपर्यंत धड वाकवा.
३. नंतर डावा पाय गुडघ्याशी वाकवा. काही वेळा दीर्घ श्वसन करा. श्वास सोडा. उजवे पाऊल डाव्या दंडाच्या मागच्या बाजूवर ठेवा. पाऊल ठेवताना पायाची बोटे हातांच्या बोटांच्या दिशेला रोखलेली राहातील अशा रीतीने पाऊल वळवा, उजवा गुडघा उजव्या दंडाच्या मागच्या बाजूवर ठेवा. (चित्र क्र.४२९)
४. उजव्या पायाची स्थिती पक्की करा. आणि काही श्वास घ्या. डावा पाय ताठ करा. तो जमिनीशी समांतर ठेवा. (चित्र क्र. ४३०)
५. श्वास सोडा. डोके जमिनीवरुन उचलून शरीर वर न्या. डावा पाय पूर्वीसारखाच ताठ आणि जमिनीशी समांतर ठेवा. कोपरे वाकलेली, दंड जमिनीशी समांतर आणि कोपरापासून मनगटापर्यंतचे हात जमिनीशी काटकोनात राहावे. (चित्र क्र. ४३१)
६. मान पुढे ताणा आणि डोके जास्तीत जास्त उंच ठेवा. या स्थितीत काही सेकंद राहा. शिंपी-पोटावर दाब येत असल्यामुळे श्वसन जलद आणि कष्टाचे होईल.
७. डावा पाय गुडघ्याशी वाकवा. डोके जमिनीवर टेका आणि सालंब शीर्षासन २ करा.
८. काही वेळा दीर्घ श्वास घ्या आणि हे आसन पुन्हा करा. यावेळी डावा पाय वाकवून अर्धपद्मासन करा. डावे पाऊल वरच्या दंडाच्या मागच्या बाजूवर ठेवा. डावा गुडघा डाव्या दंडाच्या मागच्या बाजूवर ठेवा आणि डोके जमिनीवरुन उचला. (चित्र क्र. ४३२ व ४३३) दोन्ही बाजूंकडील आसनांना सारखाच वेळ द्या. पुन्हा शीर्षासनामध्ये या.
९. या आसनाच्या शेवटी पाय खाली जमिनीवर आणावे किंवा ऊर्ध्व धनुरासनात (चित्र क्र.४८६) जाऊन ताडासनात (चित्र क्र.१) उभे राहावे. विपरीत चक्रासन (चित्र क्र. ४८८ ते ४९९) चांगले येऊ लागले म्हणजे ऊर्ध्व धनुरासनानंतर ते करणे अतिशय आल्हाददायक ठरते.
परिणाम
या आसनामुळे मनगटे मजबूत बनतात. पोटावर पावलाचा दाब येत असल्यामुळे पोटातील अवयवांना मालिश केले जाते.
N/A
References : N/A
Last Updated : September 12, 2020
TOP