मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
पार्श्वसर्वांगासन *

पार्श्वसर्वांगासन *

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(चित्र क्र. २५४)
पार्श्व म्हणजे कूस किंवा बाजू. सर्वांगासनाचा हा प्रकार धड एका कुशीला वळवून करावयाचा असतो.

पध्दती
१. प्रथम सालंब सर्वांगासन १ (चित्र क्र. २२३) करुन धड आणि पाय उजवीकडे वळवा.
२. डावा तळहात डाव्या कंबरेवर ठेवा. म्हणजे माकडहाड मनगटावर टेकेल. (चित्र क्र. २५२) शरीर डाव्या हातावर खाली आणा आणि शरीराचा भार डावे कोपर व मनगट यांवर तोलून धरा. (चित्र क्र. २५३)
३. उजवा तळहात सर्वांगसनातल्या प्रमाणे पाठीच्या छातीमागच्या भागावर राहील.
४. दोन्ही पाय डाव्या तळहातावरुन, त्याच्याशी कोण होईल अशा तर्‍हेने न्या. (चित्र क्र. २५४) आणि नेहमीप्रमाणे श्वसन करीत या स्थितीत २० सेकंद राहा.
५. श्वास सोडा. सालंब सर्वांगासन १ मध्ये पुन्हा या आणि उजव्या बाजूने हे आसन आधीइतकाच वेळ पुन्हा करा. (चित्र क्र. २५५)

परिणाम
या आसनामुळे मनगटे मजबूत बनतात. स्वादुपिंड, यकृत आणि प्लीहा यांना ह्या आसनामुळे व्यायाम घडतो, या अवयवांकडे रक्ताचा भरपूर पुरवठा होऊ लागतो आणि ही इंद्रिये निकोप राहातात.

N/A

References : N/A
Last Updated : September 11, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP