मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
नौली सोळा *

बंध आणि क्रिया - नौली सोळा *

‘योग’ हा शब्द संस्कृत भाषेतील ‘युज्’ या धातूपासून बनलेला आहे.


(चित्र क्र.५९५ आणि ५९६)
नौली हा शब्द प्रमाण शब्दकोशांमध्ये सापडत नाही. नौलीमध्ये पोटातील स्नायू व अवयव भोवर्‍याप्रमाणे उभे आणि आडवे हालवले जातात. ही नौलीची प्रक्रिया मोठी लाट किंवा फुगवटा या अर्थाच्या ‘उल्लोल’ या प्रमाणात व्यक्त होऊ शकेल. ‘नौ’ म्हणजे होडी आणि ‘ली’ म्हणजे चिकटणे, कशावर तरी पडणे, लपवणे किंवा वेष्टण घालणे. ‘वादळी समुद्रावर होडी सोडणे’ यामधून नौलीच्या प्रक्रियेची काही कल्पना येऊ शकेल. नौली ही एक प्रक्रिया आहे; आसन नाही. तिचा प्रयोग करतान काळजी घेतली पाहिजे. नाहीतर तिच्यातून अनेक रोग व विकार निर्माण होतात. तेव्हा सर्वसामान्य अभ्यासकाला या क्रियेची शिफारस मी करीत नाही. घेरंडसंहितेमध्ये ‘नौली’ चे वर्णन ‘लौलिकी’ या शीर्षकाखाली केले आहे. नौलीचा प्रयोग करण्यापूर्वी उड्डियानबंधावर प्रभुत्व मिळवावे.

पध्दती
१. ताडासनात उभे राहा. (चित्र क्र.१)
२. पावलांमध्ये एक फूट अंतर ठेवा. गुडघ्याशी किंचित् वाका आणि पुढे झुका.
३. बोटे पूर्ण पसरुन हात गुडघ्यांच्या जरा वर मांडयांवर ठेवा.
४. गळपट्टीच्या हाडांच्या मध्ये आणि उरोस्थीच्या वर असलेल्या खोबणीत हनुवटी टेकेल अशा बेताने डोके खाली न्या.
५. दीर्घ श्वास घ्या. नंतर झटकन श्वास सोडा. त्यामुळे फुफ्फुसांतून सर्व हवा जोराने बाहेर पडली पाहिजे.
६. श्वास आत न घेता रोधून धरा. पोटाचा सर्व भाग खपाटीस, कण्याकडे खेचा.
७. ओटीपोटाची कड व पोटाच्या दोन्ही बाजूकडील हालत्या बरगडया यांच्या मधील भाग, तेथे पोकळी निर्माण होण्यासाठी निश्चेष्ट बनवावा. त्याच वेळी मलाशय (abdominal recti) पुढे ढकलावा. (चित्र क्र.५९५ पुढून; आणि चित्र क्र.५९६ बाजूने)
८. तुमच्या शक्यतेप्रमाणे या स्थितीत ५ ते १० सेकंद राहा.
९. मलाशयावरील पकड सोडा आणि परिच्छेद क्र. ६ मध्ये वर्णिलेल्या स्थितीत या.
१०. पोट सैल सोडा आणि संथपणे श्वास घ्या.
११. काही वेळा दीर्घश्वसन करा. वरील परिच्छेद १ ते १० चे आवर्तन सलगपणे ६ ते ८ वेळा २४ तासांमध्ये फक्त एकदाच करा.
१२. मूत्राशय आणि मलाशय रिकामे केल्यानंतर रिकाम्या पोटावर नौलीचा अभ्यास करा.

परिणाम
पोटातील मलाशय मजबूत बनतात. नौलीचे इतर परिणाम उड्डियानबंधासारखेच होतात.

N/A

References : N/A
Last Updated : September 12, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP