वृश्चिकासन १ **
प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.
(चित्र क्र.५३६ आणि ५३७)
वृश्चिक म्हणजे विंचू. सावजाला दंश करताना विंचू आपली नांगी पाठीवर वळवतो आणि डोक्यावरुन पलीकडे नांगी मारतो. हे आसन नांगी मारणार्या विंचवाप्रमाणे दिसते, त्यामुळे हे नाव पडले आहे.
पध्दती
१. जमिनीवर गुडघे टेका, पुढे वाका आणि कोपरे, कोपरापुढील हात व पंजे एकमेकांना समांतर असे जमिनीवर टेका. हातांमधील अंतर खांद्यांमधील अंतराहून अधिक नसावे.
२. मान ताणा आणि डोके जमिनीवरुन जास्तीत जास्त उंचावर न्या.
३. श्वास सोडा. पाय व धड झोका देऊन (उसळी मारुन) वर न्या आणि पाय डोक्यापलीकडे न टाकता तोल सांभाळण्याचा यत्न करा. दंड जमिनीशी काटकोनात ठेवून छातीचा भाग वरच्या दिशेने ताणा. पाय वर लांबवा आणि शरीर तोलून धरा. याला पिंच मयूरासन (चित्र क्र. ३५७) म्हणतात.
४. कोपर्याच्या पुढील हातावर शरीर तोलून श्वास सोडा, गुडघे वाकवा, मान व डोके जमिनीपासून जास्तीत जास्त वर उचला. खांद्यापासून पाठीचा कणा ताणा आणि पावले खाली आणून टाचा टाळूवर टेकल्या जाऊ द्या. (पुढील दृश्य : चित्र क्र. ५३६) हे करता येऊ लागले की गुडघे आणि घोटे जुळलेले व पायाची बोटे ताठ ठेवण्याचा प्रयत्न करा. (बाजूकडील दृश्य : चित्र क्र.५३७) टाचांपासून गुडघ्यापर्यंतचे पाय डोक्याशी काटकोनात असले पाहिजेत. नडग्या आणि दंड एकमेकांशी समांतर असावे.
५. मान, खांदे, छाती, कणा व पोट ही सर्व ताणलेली असल्यामुळे श्वसन जलद व जोराचे असेल. श्वसन नेहमीसारखे ठेवण्याचा यत्न करा आणि सुमारे ३० सेकंदाच्या जवळपास जास्तीत जास्त वेळ या स्थितीत राहा.
६. तुम्हाला शक्य तितका वेळ त्या स्थितीत राहिल्यावर पाय डोक्याच्या पलीकडे जमिनीवर टेका. कोपरे जमिनीवरुन उचला. हात ताठ करुन ऊर्ध्व धनुरासन करा. (चित्र क्र. ४८६).
७. नंतर ताडासनात उभे राहा (चित्र क्र. १) किंवा विपरीत चक्रासन करा. (चित्र क्र.४८८ ते ४९९).
८. वृश्चिकासनामुळे पाठीला मिळालेला ताण कमी करण्यासाठी पुढे वाका आणि गुडघे न वाकवता तळहात जमिनीवर टेका. उत्तानास. (चित्र क्र. ४८)
N/A
References : N/A
Last Updated : September 12, 2020
TOP