मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
ऊर्ध्वमुख पश्चिमोत्तानासन २ *

ऊर्ध्वमुख पश्चिमोत्तानासन २ *

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(चित्र क्र. १७०)
पध्दती
१. जमिनीवर किंवा सतरंजीवर उताणे झोपा. हात सरळ डोक्याच्या मागे ठेवा. (चित्र क्र. २७६)
२. पाय सरळ पुढे ताणा. गुडघे आवळा आणि काही वेळा दीर्घ श्वसन करा.
३. श्वास सोडा. दोन्ही पाय हळूहळू वर उचला आणि ते वर आणा.
४. बोटे एकमेकांत गुंफा त्यांनी पायाचे चवडे पकडा. आणि गुडघे आवळलेले ठेवून पाय सरळ वरच्या दिशेला ताणा. संपूर्ण पाठ जमिनीला टेकलेली राहू द्या. (चित्र क्र. १६९) तीनदा दीर्घ श्वास घ्या.
५. श्वास सोडा. कोपरे एकमेकांपासून दूर नेऊन पाय डोक्याच्या मागे जमिनीकडे झुकवा. ओटीपोट जमिनीच्या शक्य तितके जवळ ठेवण्याचा प्रयत्न करा. पाय गुडघ्यांशी सर्वकाळ घट्ट आवळलेले असू द्या. हनुवटी गुडघ्यांवर टेका. (चित्र क्र. १७०)
६. समतोल श्वसन करीत या स्थितीत ३० ते ६० सेकंद राहा.
७. श्वास सोडा आणि पाय पूर्वस्थितीला आणा. (चित्र क्र. १६९.)
८. श्वास घ्या. हात मोकळे करा. पाय सरळ जमिनीवर आणा. (चित्र क्र. २७६) आणि विसावा घ्या.

परिणाम
या आसनामुळे शरीराला तोल आणि डौल येतो. पाय पूर्णपणे ताणले जातात, त्यामुळे मांडया आणि पोटर्‍या रेखीव बनतात. पश्चिमोत्तानासनाचे (चित्र क्र. १६०) सर्व फायदे या आसनामुळेही मिळतात आणि त्याशिवाय या आसनामुळे अंतर्गळाला प्रतिबंध होतो व पाठीचे तीव्र दुखणे नाहीसे होते.

N/A

References : N/A
Last Updated : September 12, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP