ऊर्ध्व प्रसारित पादासन *
प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.
(चित्र क्र. २७६ ते २७९)
ऊर्ध्व म्हणजे सरळ उभा, वर किंवा उंच. प्रसारित म्हणजे लांबवलेला किंवा ताणलेला. आणि पाद म्हणजे पाय.
पध्दती
१. पाय लांब पसरुन आणि गुडघ्याशी घट्ट आवळून उताणे निजा. हात पायाच्या बाजूला ठेवा. (चित्र क्र. २१९)
२. श्वास सोडा. हात डोक्यावरुन पलीकडे न्या. आणि सरळ लांब ताणा. (चित्र क्र. २७६) दोनदा श्वास घ्या.
३. श्वास सोडा. पाय ६० अंशावर न्या (चित्र क्र. २७७) आणि नेहमीप्रमाणे श्वसन करीत १५ ते २० सेकंद राहा.
४. श्वास सोडा. पाय ६० अंशावर न्या (चित्र क्र. २७८) आणि नेहमीप्रमाणे श्वसन करीत १५ ते २० सेकंद राहा.
५. पुन्हा श्वास सोडा. पाय आणखी वर नेऊन काटकोनात न्या (चित्र क्र. २७९) आणि नेहमीप्रमाणे श्वसन करीत या स्थितीत ३० ते ६० सेकंद राहा.
६. आता श्वास सोडा. हळूहळू पाय जमिनीवर आणा आणि विसावा घ्या.
७. क्र. २ ते ६ या कृती ३ ते ४ वेळा पुन्हा करा.
टीप
या तीनही स्थिती अखंडितपणे करता आल्या नाहीत तर प्रत्येक स्थितीनंतर विश्रांती घेत तीन टप्प्यांमध्ये त्या पूर्ण करा.
परिणाम
पोटाभोवतीची चरबी कमी करण्याच्या दृष्टीने हा एक विलक्षण प्रभावी व्यायाम आहे. पाठीचा तळचा भाग त्यामुळे मजबूत बनतो. पोटातील अवयव सुधारतात आणि जठरविकार व वातरोग यांचा त्रास कमी होतो.
N/A
References : N/A
Last Updated : September 12, 2020
TOP