मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
गंड भेरंडासन ***

गंड भेरंडासन ***

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(चित्र क्र.५८० आणि ५८१).
गंड म्हणजे गाल, कपाळासह चेहर्‍याची एक बाजू (गंडस्थल), भेरंड म्हणजे भयंकर, अजस्त्र; ही एक पक्षीही आहे. पाठ वाकवून करण्याचे हे आसन दोन टप्प्यांत दिले आहे.

पध्दती
१. सतरंजीची घडी करुन जमिनीवर ठेवा आणि तिच्यावर सरळ पालथे निजा. तोंड जमिनीकडे व हात मागे ताणलेले असू द्या. मान ताणुन हनुवती सतरंजीवर पक्की टेका, नाहीतर ती जमिनीवर खरचटेल.
२. कोपरे वाकवा आणि हात छातीजवळ ठेवा, बोटे डोक्याच्या दिशेला रोखलेली असू द्या. गुडघे वाकवा. छातीच्या दिशेने पावले सरकवा तेव्हा छाती जमिनीपासून किंचित वर उचलली जाईल. (चित्र क्र. ५७१)
३. श्वास सोडा, तळहात जमिनीवर दाबा, झटका देऊन पाय सरळ वर उचला. (चित्र क्र.५७२) हनुवटी, मान, हात आणि वरच्या बरगडया एवढेच भाग जमिनीवरच्या सतरंजीला लागून असतील.
४. शरीराचा भार नाक व हनुवटी यांवर घ्या. गुडघे वाकवा. (चित्र क्र.५७३) पाय खाली आणून डोक्यावर टेका. (चित्र क्र.५७४) काही वेळ श्वास घ्या.
५. श्वास सोडा, पाय आणखी खाली आणा आणि पाय डोक्याच्या समोर आणा. (चित्र क्र.५७५)
६. तळहात जमिनीवरुन उचला, हात खांद्यापासून पुढे रुंदावा, ते एकामागून एक असे डोक्यापुढे आणा, हातांनी पावले धरा. (चित्र क्र.५७६ आणि ५७७). दोनदा श्वास घ्या.
७. श्वास सोडा, चेहर्‍याच्या दोन बाजूंस कपाळ व गाल यांच्याशेजारी पावले ओढून जमिनीवर टेका. (चित्र क्र.५७८). टाचा खांद्यांना लागून असाव्या. आता मनगटे व कोपरापुढचे हात यांनी बोटे दाबून धरा. (चित्र क्र.५७९)
८. बोटे गुंफा, आणि पावलांचा वरचा भाग मनगटांनी दाबून तळहात जमिनीवर ठेवा. (चित्र क्र.५८०) हा आसनाचा पहिला टप्पा.
९. काही सेकंद या स्थितीत राहा. कणा अत्यंत ताणला गेल्यामुळे आणि पोट आकुंचित झाल्यामुळे श्वसन अतिशय जलद व कष्टाचे होईल. श्वास रोखून धरु नका.
१०. संथपणे उडणार्‍या पक्ष्याच्या पंखांप्रमाणे हात दोन बाजूस सरळ पसरा आणि काही सेकंद शरीर तोलून धरा. (चित्र क्र.५८१) हा दुसरा टप्पा असून तो पहिल्या टप्प्यापेक्षा कठीण आहे.
११. तळहात जमिनीवर ठेवा व शरीर हनुवटीवर आणा. (चित्र क्र.५८२ आणि ५८३). ऊर्ध्व धनुरासनात (चित्र क्र.४८६) आणि ताडासनात उभे राहा. (चित्र क्र.१) आणि आराम करा, किंवा विपरीत चक्रासन करा. (चित्र क्र. ४८८ ते ४९९).

परिणाम
संपूर्ण कणा व पोटाचे अवयव यांना सुदृढता मिळण्याखेरीज या आसनामुळे मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, आणि विशुध्दी चक्र यांमधील नाडीकेंद्रे व तेथील ग्रंथी उत्तेजित होतात. या ग्रंथींन रक्ताचा भरपूर पुरवठा होत असल्यामुळे त्यांचे कार्य सुधारते आणि त्यामुळे चैतन्य वाढते.

N/A

References : N/A
Last Updated : September 12, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP