विरंच्यासन २ *
प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.
(चित्र क्र. ३८८)
पध्दती
१. पाय सरळ पसरुन जमिनीवर बसा. (चित्र क्र. ७७)
२. डावा पाय गुडघ्याशी वाकवा. आणि तो मागे आणा. डावे पाऊल कंबरेच्या सांध्याजवळ ठेवा. बोटे पाठीमागे रोखलेली आणि जमिनीवर टेकलेली असू द्या. आता डावा पाय वीरासनामध्ये (चित्र क्र.८९) असेल.
३. यानंतर विरंच्यासन १ (चित्र क्र. ३८६) यासाठी दिलेली पध्दती अनुसरा.
परिणाम
या दोन्ही आसनांमुळे पाठ आणि मान सशक्त बनतात. आणि खांद्यांच्या हालचाली अधिक मोकळ्या होऊ लागतात. मांडया आणि गुडघ्यांमागील जोडस्नायू पूर्णपणे ताणले जातात. पोटातील स्नायू आकुंचित होतात आणि पचनशक्ती वाढते.
N/A
References : N/A
Last Updated : September 12, 2020
TOP