मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
मंडलासन **

मंडलासन **

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(चित्र क्र.५२५ ते ५३५) करा.
मंडल म्हणजे चक्र, घेर, परिघ, कक्षा. डोके आणि हात सालंब शीर्षासन १ (चित्र क्र.१९०) मध्ये ठेवून प्रथम घडयाळाच्या काटयाच्या दिशेने आणि नंतर त्याविरुध्द दिशेने फिरा. डोके स्थिर राहून तुमच्या पायांची हालचाल चक्राकार किंवा मंडलाकार होईल.

पध्दती
१. द्विपाद विपरीत दंडासन (चित्र क्र.५२५) करा.
२. डोक्याची स्थिती कायम ठेवून खांदे व छाती जास्तीत जास्त उंच न्या.
३. पाय घडयाळाच्या काटयाच्या दिशेने एकामागून एक टाकीत जा आणि अशा रीतीने डोक्याभोवती मंडल करा. पाय ३ वाजताच्या आणि ९ वाजताच्या ठिकाणी आले की विरुध्द बाजूचा खांदा जरा उचला आणि छाती वर व पुढे नेऊन धड चित्रात दाखवल्याप्रमाणे फिरवा. (चित्र क्र. ५२५ ते ५३५). पाठीचा कणा पूर्ण वर्तुळात म्हणजे ३६० अंशांमध्ये फिरवला जातो.
४. घडयाळाच्या काटयाच्या दिशेने मंडल पूर्ण केल्यावर जरा थांबा व थोडा वेळ दीर्घ श्वसन करा. मग चित्रामधील सूचना उलटया क्रमाने अनुसरत घडयाळाच्या विरुध्द दिशेने सर्व कृती करा.
५. पुरेसा लवचिकपणा आणण्यासाठी ऊर्ध्व धनुरासनांतर्गत (चित्र क्र. ४८६). विपरीत चक्रासन (चित्र क्र.४८८ ते ४९९) करुन पाठीचा कणा आधी लवचिक करणे आवश्यक आहे. प्रारंभीच्या काळात मान व खांदे जमिनीकडे झुकू लागतील. ती पुरेशी कणखर झाली आणि पाठीमध्ये लवचिकपणा आला म्हणजे हे आसन सोपे जाऊ लागते.

परिणाम
मंडल घेताना धड आणि पोट एका बाजूला आकुंचित होते आणि दुसर्‍या बाजूला ताणले जाते. त्यामुळे कणा व पोटातील अवयव सुदृढ राहातात आणि आरोग्य व आयुष्य यांची वृध्दी होते.

N/A

References : N/A
Last Updated : September 12, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP