मालासन २ *
प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.
(चित्र क्र. ३२२)
१. पाय एकत्र ठेवून ढुंगणावर बसा. चवडे आणि टाचा जमिनीवर पूर्णपणे टेकलेल्या असाव्यात. जमिनीवरुन ढुंगण वर उचला आणि तोल सावरा. (चित्र क्र. ३१७)
२. मांडया आणि गुडघे फाकवा आणि बगला गुडघ्यांच्या पलीकडे जातील अशा बेताने धड पुढे न्या.
३. पुढे वाका आणि घोटयाचा मागचा भाग पकडा.
४. घोटे पकडल्यानंतर श्वास सोडा आणि डोके पायाच्या बोटांपर्यंत नेऊन कपाळ तेथे टेका. (चित्र क्र. ३२२)
५. नेहमीप्रमाणे श्वसन करीत या स्थितीत एक मिनिट राहा.
६. श्वास घ्या. डोके वर उचला. घोटयांवरील पकड सोडा आणि जमिनीवर विसावा घ्या.
परिणाम
या आसनामुळे पोटातील अवयवांना व्यायाम मिळतो आणि ते मजबूत बनतात. मासिक पाळीत ज्या स्त्रियांची पाठ अतिशय दुखू लागते त्यांना या आसनामुळे आराम लाभेल व पाठीच्या वेदना नाहीशा होतील. वरील दोन आसनांमध्ये दोन्ही हात मानेपासून हाराप्रमाणे खाली रुळतात. त्यामुळे आसनांना हे नाव मिळाले आहे.
N/A
References : N/A
Last Updated : September 12, 2020
TOP