मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
पार्श्वैकपाद सर्वांगासन *

पार्श्वैकपाद सर्वांगासन *

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(चित्र क्र. २५१)
पार्श्व म्हणजे कूस किंवा बाजू. एकपाद सर्वांगासन (चित्र क्र. २५०) मध्ये खालचा पाय डोक्याच्या मागे टेकलेला असतो. उलट या आसनात तो धडाच्या रेषेमध्ये त्याच्या एका बाजूला टेकलेला असतो.

पध्दती
१. वर वर्णन केल्याप्रमाणे दोन्ही बाजूंनी एकपाद सर्वांगासन करा. आणि पुन्हा सर्वांगासनात या.
२. श्वास सोडा. उजवा पाय एका बाजूला व धडाच्या रेषेत येईल अशा तर्‍हेने खाली आणा (चित्र क्र. २५१) उजवा पाय सरळ आणि ताठ ठेवा. तो गुडघ्याशी वाकवू नका.
३. काटकोनात असलेला डावा पाय सरळ उभा ठेवावा. उजवीकडे कलू देऊ नये. छाती पूर्णपणे फुगविण्यासाठी तळहातांनी बरगडया वर उचलाव्यात.
४. नेहमीप्रमाणे श्वसन करीत या स्थितीमध्ये सुमारे २० सेकंद राहा. श्वास सोडा आणि पुन्हा सर्वांगासनात या. आता दुसर्‍या पायाने हे आसन आधीच्या इतकाच वेळ करा. पुन्हा सर्वांगासनात या.

परिणाम
या आसनामुळे बध्दकोष्ठ नाहीसे होते. आणि मूत्रपिंड सुधारतात.

N/A

References : N/A
Last Updated : September 11, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP