एकपाद बकासन २ **
प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.
चित्र क्र.४५१ व ४५२
पध्दती
१. सालंब शीर्षासन २ (चित्र क्र.१९२) करा.
२. श्वास सोडा. पाय जमिनीशी समांतर होईपर्यंत खाली आणा. (चित्र क्र.४३४). डावा गुडघा वाकवा आणि डावी नडगी बकासनातल्याप्रमाणे (चित्र क्र. ४१०) डाव्या दंडाच्या मागच्या बगलेच्या जास्तीत जास्त जवळ टेका. उजवा पाय उजव्या दंडाच्या पलीकडे जाईल आणि उजव्या मांडीची आतली बाजू उजव्या दंडाच्या मागच्या बाजूला स्पर्श करील, अशा तर्हेने उजवा पाय पुढे आणा. आणि तो जमिनीला न टेकवता सरळ पुढे लांबवा. हात सरळ ताणा आणि तोल सांभाळा. (चित्र क्र. ४५१ आणि ४५२)
४. पाठीचा कणा आणि उजवा पाय ही पूर्णपणे विस्तारुन, या स्थितीत १० ते २० सेकंद राहा. नेहमीप्रमाणे श्वसन करण्याचा प्रयत्न करा.
५. उजवा गुडघा वाकवा. डोके जमिनीवर टेका. आणि सालंब शीर्षासन २ मध्ये (चित्र क्र. १९२) या.
६. डावा पाय सरळ समोर लांबवलेला आणि वाकवलेला, उजवा पाय उजव्या दंडाच्या मागच्या बाजूवर ठेवलेला, अशा रीतीने हे आसन दुसर्या बाजूने आधीच्या इतकाच वेळ पुन्हा करा.
७. हे आसन पूर्ण करण्याच्या दोन पध्दती आहेत. सरळ समोर पसरलेला पाय वाकवा. मग शीर्षासनात जा आणि पाय खाली आणा. या पध्दतीवर प्रभुत्व मिळाले म्हणजे दुसर्या पध्दतीकडे वळण्यास हरकत नाही. या पध्दतीत पाय सरळ समोर पसरलेलाच ठेवावा. नंतर कोपरे वाकवावीत. वाकवलेला पाय मागच्या बाजूला ताणावा आणि तो जमिनीला न टेकवता ताठ आणि जमिनीशी समांतर ठेवावा. सबंध शरीर आणि डोके जमिनीपासून दूर ठेवा. आता तुम्ही एकपाद कौंडिण्यासन २ (चित्र क्र. ४४२ आणि ४४३) मध्ये आहात. त्यानंतर श्वास सोडा. दोन्ही पाय वाकवा. डोके जमिनीवर टेका आणि शीर्षासन २ मध्ये वर जा. नंतर ऊर्ध्व धनुरासन (चित्र क्र. ४८६) करुन त्यामागोमाग विपरीत चक्रासन (चित्र क्र. ४८८ ते ४९९) करा.
परिणाम
या आसनामुळे पोटातील अवयव आणि स्नायू, तसेच दोन्ही हात, छाती व पाठ ही मजबूत बनतात. आपले स्वत:चे शरीर म्हणजे वजन उचलण्याची साधनसामग्री बनते. आणि ज्या अनेक दिशांना शरीर वळवले जाते त्या त्या बाजूकडील अंगे शरीराचा भार आपल्यावर घेतात व त्यामुळे सशक्त बनतात.
N/A
References : N/A
Last Updated : September 12, 2020
TOP