वृक्षासन *
‘योग’ हा शब्द संस्कृत भाषेतील ‘युज्’ या धातूपासून बनलेला आहे.
(चित्र क्रमांक २)
पध्दती
१. ताडासनात उभे राहा. (चित्र क्रमांक १)
२. उजवा पाय गुडघ्याशी वाकवा आणि उजवी टाच डाव्या मांडीच्या मुळाशी ठेवा. बोटे जमिनीकडे रोखून ते पाऊल डाव्या मांडीवर विसावू द्या.
३. डाव्या पायावर तोल सावरा. दोन्ही तळहात जुळवून डोक्यावर लांबवा. (चित्र क्रमांक २)
४. दीर्घ श्वसन करीत काही सेकंद या स्थितीत राहा. मग हात खाली घ्या. जुळवलेले तळहात एकमेकांपासून दूर करा. उजवा पाय सरळ करा आणि ताडासनात उभे राहा.
५. आता उजव्या पायावर उभे राहून डावी टाच उजव्या मांडीच्या मुळाशी टेका. आधीच्या इतकाच वेळ या स्थितीत उभे राहा. पुन्हा ताडासन करा (चित्र क्रमांक १) आणि विसावा घ्या.
परिणाम
या आसनामुळे पायांचे स्नायू सुदृढ होतात आणि शरीराला तोल येतो.
N/A
References : N/A
Last Updated : September 08, 2020
TOP