पार्श्वधनुरासन *
प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.
(चित्र क्र. ६४ व ६५)
पार्श्व म्हणजे बाजू किंवा कूस. धनुरासनाचा हा प्रकार एका कुशीवर निजून करावयाचा असतो.
पध्दती
१. धनुरासन करा. (चित्र क्र. ६३)
२. श्वास सोडा. उजव्या कुशीवर वळा आणि पाय व छाती यांना ताण द्या.
३. श्वास घ्या. आणि क्र. १ च्या स्थितीत या. मग श्वास सोडा आणि डाव्या कुशीवर वळा. (चित्र क्र. ६५)
४. नेहमीप्रमाणे श्वसन करीत तुमच्या क्षमतेनुसार दोन्ही कुशींवर सारखाच वेळ राहा. श्वास घ्या. धनुरासनात या. पाय मोकळे करा आणि विसावा घ्या.
५. हा प्रकार या आसनाच्या मूळ प्रकारापेक्षा अधिक मेहनतीचा आहे. त्यामुळे हे आसन करताना हातांच्या पकडीतून घोटे निसटण्याचा संभव असतो. तेव्हा घोटयांवरील पकड घट्ट ठेवावी.
परिणाम
दोन्ही कुशीवर वळल्यामुळे पोटाचे स्नायू जमिनीवर दाबले जातात आणि त्यांना आपोआप मालीश होते.
N/A
References : N/A
Last Updated : September 09, 2020
TOP