एकपाद राजकपोतासन १ **
प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.
(चित्र क्र.५४५)
पध्दती
१. पाय सरळ समोर पसरुन जमिनीवर बसा. (चित्र क्र.७७)
२. उजवा गुडघा वाकवा आणि उजव्या पावलाची टाच व चवडा जमिनीवर टेका. मग उजव्या पायाची नडगी जमिनीशी जवळजवळ काटकोन करील आणि पोटरी मांडीच्या मागच्या भागाला लगटून राहील. उजवी टाच शिवणीजवळ ठेवा. उजवा पाय आता मरीच्यासन १ (चित्र क्र.१४४) मध्ये राहील.
३. डावा पाय मागे न्या आणि तो पूर्णपणे जमिनीवर टेकून ठेवा.
४. डावी नडगी जमिनीशी काटकोनात येईल अशा तर्हेने डावा पाय गुडघ्याशी वाकवा. उजवे पाऊल व डावा गुडघा यांवर शरीराचा भार घ्या. तोल सांभाळण्यासाठी उजवी मांडी जमिनीशी समांतर होईल आणि नडगी जमिनीशी ४० अंशांचा कोन करील इतका उजवा गुडघा पुढे ढकला.
५. श्वास सोडून उजवा हात डोक्यावरुन पलीकडे न्या आणि उजव्या हाताने डावे पाऊल घट्ट धरा. काही वेळ श्वसन केल्यावर श्वास सोडून डावा हात डोक्यावरुन मागे नेऊन तेच पाऊल डाव्या हातानेही धरा. डोके त्या पावलांवर टेका. (चित्र क्र.५४५)
६. छाती पुढे करा आणि या स्थितीत सुमारे १५ सेकंद स्थिर राहा.
७. छाती फुगवल्यामुळे व पोटाच्या आकुंचनामुळे श्वसन जलद होईल. ते नेहमीसारखे ठेवण्याचा प्रयत्न करा.
८. घोटयावरील पकड सैल करा आणि पाय ताठ करा.
९. हे आसन दुसर्या बाजूने पुन्हा करा. या वेळी डावा पाय मरीच्यासन १ प्रमाणे असेल, उजवे पाऊल दोन्ही हातांनी पकडले जाईल व डोके त्यावर टेकलेले असताना तोल सांभाळला जाईल. दोन्हीकडील आसनांना सारखाच वेळ द्या.
१०. तोल सांभाळण्यातील अडचणीवर मात करता येऊ लागली की हे आसन आधीच्या आसनापेक्षा सुलभपणे करता येते.
N/A
References : N/A
Last Updated : September 12, 2020
TOP