मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
शलभासन *

शलभासन *

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(चित्र क्र. ६०)
शलभ म्हणजे टोळ. जमिनीवर बसलेल्या टोळाप्रमाणे या आसनामध्ये शरीर दिसते म्हणून हे नाव दिले आहे.

पध्दती
१. जमिनीवर सरळ, पालथे झोपा. चेहरा जमिनीकडे असू द्या. हात पाठीमागे लांबवा.
२. श्वास सोडा आणि एकाच वेळी डोके, छाती व पाय जमिनीवरुन जास्तीत जास्त वर उचला. हात आणि बरगडया जमिनीवर टेकलेल्या असता कामा नयेत. शरीराचा फक्त पोटाचा भाग जमिनीला टेकलेला असेल आणि शरीराचा भाग त्याच भागावर असेल. (चित्र क्र. ६०)
३. कुल्ले आकुंचित करा आणि मांडीच्या स्नायूंना ताण द्या. दोन्ही पाय पूर्णपणे ताणलेले आणि सरळ ठेवा. मांडया, गुडघे आणि घोटे एकमेकांशी जुळलेले असू द्या.
४. शरीराचा भार हातांवर घेऊ नका. पाठीच्या वरच्या भागातील स्नायूंना व्यायाम घडावा यासाठी हात मागच्या दिशेला पूर्णपणे राहू द्या.
५. नेहमीप्रमाणे श्वसन करीत शक्य तितका अधिक वेळ या स्थितीत रहा.
६. प्रारंभी छाती आणि पाय जमिनीवरुन उचलून धरणे कठीण जाते. परंतु पोटाचे स्नायू सशक्त होत जातील, तसतसे ते सोपे बनते.

परिणाम
या आसनामुळे पचनाला मदत होते. जठरविषयक त्रास कमी होतात आणि वातरोग नाहीसा होतो. पाठीचा कणा ताणला गेल्यामुळे लवचिक बनतो. आणि त्रिकास्थीजवळच्या व कंबरेजवळच्या वेदना या आसनामुळे थांबतात. कण्यातील चकत्या सरकलेल्या व्यक्तींना सक्तीची विश्रांती किंवा शस्त्रक्रिया यांची आवश्यकता न लागता हे आसन नियमितपणे करण्यामुळे फायदा होतो, असा माझा अनुभव आहे. या आसनामुळे मूत्राशय आणि प्रोस्टेट ग्रंथी यांना निकोपपणा लाभतो. पाठीच्या खालच्या कळा कमी करण्यासाठी या आसनाचा एक वेगळा प्रकार करुन पाहता येईल. या प्रकारात पाय गुडघ्याशी वाकवले जातात. मांडया एकमेकींपासून दूर ठेवल्या जातात. आणि नडग्या जमिनीशी काटकोनात ठेवल्या जातात. मग श्वास सोडून मांडया जमिनीवरुन उचलल्या जातात आणि गुडघे एकमेकाला लागतील इतक्या मांडया एकत्र आणल्या जातात. मात्र नडग्या काटकोनातच राहतात. (चित्र क्र. ६१) घेरंड संहितेच्या दुसर्‍या अध्यायातील चाळीसाव्या श्लोकात वर्णन आहे.

N/A

References : N/A
Last Updated : September 09, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP