मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
हनुमानासन **

हनुमानासन **

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(चित्र क्र.४७५, ४७६ आणि ४७६अ)
हनुमान हे अलौकिक शक्ती आणि शौर्य असलेल्या एका वानर प्रमुखाचे नाव. अंजनीला वायूपासून झालेला हा मुलगा होता. विष्णूचा सातवा अवतार जो राम याचा हनुमान हा भक्त होता. जेव्हा राम, सीता आणि लक्ष्मण दंडकारण्यामध्ये वनवासाचा काळ घालवीत होते, तेव्हा राम-लक्ष्मण शिकारीला गेलेले असताना लंकेचा राजा रावण याने वैराग्याच्या वेशात तिथे येऊन सीतेला लंकेला पळवून नेले. दोघा भावांनी सीतेचा पुष्कळ शोध केला आणि वानरांचा राजा सुग्रीव व त्याचा सेनापती हनुमान यांची मदत घेतली. हनुमान सीतेच्या शोधासाठी समुद्रावरुन उड्डाण करुन पलीकडे गेला. रावणाच्या राजवाडयात सीतेला पाहून त्याने ती वार्ता रामाला येऊन सांगितली. वानरांच्या आणि अस्वलांच्या प्रचंड सेनेच्या मदतीने रामाने समुद्रावर सेतू बांधला. भयंकर क्रुध्द करुन रावण व त्याचे सैन्य यांचा नि:पात केला आणि सीतेला परत आणली. युध्द चालू असताना लक्ष्मणाला बाण लागून तो बेशुध्द झाला. हिमालयामध्ये सापडणार्‍या एका वनस्पतीचा रस औषध म्हणून दिल्याखेरीज तो उठणे शक्य नव्हते; तेव्हा एक प्रचंड उड्डाण करुन हनुमानाने समुद्रापलीकडे जाऊन हिमालय गाठला आणि ती संजीवक वनस्पती ज्या पर्वत शिखरावर होती ते शिखर उपटून त तो लंकेमध्ये घेऊन आला. अशा तर्‍हेने त्याने लक्ष्मणाचा जीव वाचविला. त्याच्या या भीमपराक्रमांची आठवण म्हणून या आसनाला त्याचे नाव दिले आहे. यात आधी जमिनीवर बसून दोन पाय दोन बाजूंना पसरुन हात छातीसमोर जुळवायचे असतात. पाश्चिमात्य नृत्यामधील ‘स्ल्प्ट’ या प्रकाराशी या आसनाचे साम्य आहे.

पध्दती
१. पाय जमिनीवर गुडघे टेका. (चित्र क्र. ४०)
२. तळहात शरीराच्या बाजूंना एक फूट अंतरावर जमिनीवर टेका.
३. गुडघे वर उचला. उजवा पाय पुढे आणा आणि डावा पाय मार्ग न्या. (चित्र क्र. ४७२) श्वास सोडून दोन्ही पाय ताणून ताठ ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि कंबर वर उचलून धरा. (चित्र क्र. ४७३) नंतर पाय आणि कुल्ले जमिनीवर दाबून धरा आणि शरीराचा भार हातांवर घ्या. (चित्र क्र. ४७४)
४. ही स्थिती चांगल्या तर्‍हेने आत्मसात होण्यास दीर्घ काळ लागतो आणि दररोज पाय सरळ आणि ताठ अवस्थेत जमिनीवर टेकण्याचे, तसेच कुल्ले जमिनीवर टेकण्याचे अनेकदा प्रयत्न करावे लागतात. पुढल्या पायाची मागची बाजू आणि मागच्या पायाची पुढली बाजू जमिनीला चिकटलेली असावी.
५. एकदा पाय सरळ व ताठ अवस्थेत ठेवता येऊ लागला म्हणजे कुल्ले
जमिनीवर टेकवा. हात वर उचला. ते छातीच्या पुढे जुळवा आणि शरीर तोलून धरा. (चित्र क्र. ४७५) नेहमीप्रमाणे श्वसन करीत या स्थितीत १० ते ३० सेकंद राहा.
६. त्यानंतर हातांच्या मदतीने कुल्ले वर उचला. व डावा पाय पुढे व उजवा पाय मागे अशा पध्दतीने हे आसन आधीइतकाच वेळ पुन्हा करा. (चित्र क्र. ४७६)
७. पुढे ठेवलेल्या पायाच्या गुडघ्याची मागची बाजू आणि मागच्या पायाचा गुडघा जमिनीला टेकून ठेवावा.
८. प्रगत अभ्यासकांनी हात डोक्यावर नेऊन ते ताणून व जुळवून तोल सांभाळण्यास हरकत नाही. (चित्र क्र. ४७६ अ) यामुळे पायांना जादा ताण मिळतो आणि पाठीवरचा ताण कमी होतो.

परिणाम
या सुंदर आसनामुळे सायटिका व पायातील इतर विकृती नाहीशा होतात. पायाचे स्नायू सुदृढ बनतात आणि पाय निकोप राहातात. धावण्याचा व्यायाम करणारे आणि धावण्याच्या शर्यतीत भाग घेणारे जे व्यायामपटू असतात त्यांनी हे आसन नियमितपणे करावे. मांडयांचे अपवर्तनी स्नायू या आसनामुळे विसावतात आणि सशक्त बनतात.

N/A

References : N/A
Last Updated : September 12, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP