मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
ऊर्ध्व प्रसारित एकपादासन *

ऊर्ध्व प्रसारित एकपादासन *

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(चित्र क्र. ४९)
ऊर्ध्व म्हणजे सरळ उभा, वरचा किंवा उंच. प्रसारित म्हणजे पसरलेला किंवा ताणलेला. हे आसन एका पायावर उभे राहून पुढे वाकून आणि दुसरा पाय वरच्या दिशेने जास्तीत जास्त उंचीपर्यंत नेऊन करावयाचे असते.

पध्दती
१. ताडासनात उभे राहा. (चित्र क्र. १)
२. श्वास सोडा. आणि धड पुढे वाकवा. डाव्या हाताने उजव्या घोटयाची मागची बाजू पकडा. उजवा हात उजव्या पावलाच्या शेजारी जमिनीवर टेकवा आणि डोके किंवा हनुवटी गुडघ्यावर विसावू द्या.
३. डावा पाय उचलून हवेमध्ये जास्तीत जास्त उंच उचलून धरा. दोन्ही गुडघे घट्ट आवळून धरा. उचललेल्या पायाची बोटे वरच्या दिशेला असूद्यात. पायाची बोटे सरळ समोर रोखलेली राहावीत, बाजूला वाकू नयेत, यासाठी दोन्ही पाय ताठ ठेवावेत. (चित्र क्र. ४९)
४. या स्थितीत समतोल श्वसन करीत सुमारे २० सेकंद रहा. श्वास घ्या. डावा पाय जमिनीवर आणा आणि पुन्हा ताडासनात या. (चित्र क्र.१)
५. आता डावा पाय जमिनीवर आणि उजवा पाय हवेत ठेवून दुसर्‍या बाजूने हेच आसन पुन्हा करा. दोन्ही बाजूंकडील आसनांमध्ये सारखाच वेळ रहा.

परिणाम
या आसनामुळे पायाचे स्नायू सुदृढ बनतात आणि पुठ्ठ्याभोवतीचा मेद झडतो.

N/A

References : N/A
Last Updated : September 09, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP