कर्णपीडासन *
प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.
(चित्र क्र. २४६)
कर्ण म्हणजे कान आणि पीडा म्हणजे वेदना किंवा दाब. हलासनाचाच हा एक वेगळा प्रकार आहे व तो हलासनाबरोबरच करता येतो.
पध्दती
१. हलासन करा. (चित्र क्र. २४४) आणि हलासनाल द्यावयाचा वेळ पूर्ण झाल्यावर गुडघे वाकवा. आणि उजवा गुडघा उजव्या कानाशी व डावा गुडघा डाव्या कानाशी टेकवा.
२. दोन्ही गुडघे कानांवर दाब देत जमिनीवर टेकलेले असावेत.
३. पायाची बोटे लांब ताणलेली असू द्या आणि आंगठे व टाचा जुळलेल्या असूद्यात. हाताचे पंजे एक तर बरगडयांच्या मागच्या बाजूला (चित्र क्र. २४५) टेका; किंवा हलासनाघातल्याप्रमाणे बोटे एकमेकात गुंफून ताणून लांबवा (चित्र क्र. २४६).
४. या स्थितीत नेहमीप्रमाणे श्वसन करीत अर्धे ते एक मिनिट राहा.
परिणाम
ह्या आसनामुळे धड, हृदय आणि पाय यांना विश्रांती मिळते. गुडघे वाकवलेले असताना पाठीच्या कण्याला अधिक ताण दिला जातो आणि त्यामुळे कंबरेभोवती रक्ताभिसरण अधिक चांगल्या तर्हेने होऊ लागते.
N/A
References : N/A
Last Updated : September 11, 2020
TOP