उभय पादांगुष्ठासन *
प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.
(चित्र क्र. १६७)
(उभय म्हणजे दोन्ही, पादांगुष्ठ म्हणजे पायाचा आंगठा.)
यात सुरवातीला पाठीमागे झुकावयाचे असते. आणि कुल्ल्यांवर सबंध शरीराचा तोल सांभाळण्याचा सराव होण्यास वेळ लागतो. या स्थितीमध्ये नेहमीप्रमाणे श्वसन करीत ३० ते ६० सेकंद राहा.
४. तोल सांभाळल्यावर आंगठे सोडा. आणि टाचा पकडा.
५. हे सहजपणाने जमू लागले म्हणजे लांबवलेल्या पावलांच्या पाठीमागे बोटे एकमेकांत गुंफा आणि तोल सांभाळा. त्यानंतर पायांची स्थिती बदलणार नाही अशा रीतीने डोके आणि धड पायांच्या जवळ न्या. मान वर ताणा आणि श्वास सोडून कपाळ गुडघ्यांवर टेका. (चित्र क्र. १६८) आता पायांना वरच्या दिशेने संपूर्ण ताण द्या. आणि पाठीचा कणाही ताणून धरा. नेहमीप्रमाणे श्वसन करीत या स्थितीत सुमारे ३० सेकंद राहा.
६. श्वास घ्या. हात मोकळे करा. पाय वाकवा. ते जमिनीवर टेका आणि विसावा घ्या.
N/A
References : N/A
Last Updated : September 12, 2020
TOP