उत्थित पार्श्व कोणासन *
‘योग’ हा शब्द संस्कृत भाषेतील ‘युज्’ या धातूपासून बनलेला आहे.
(चित्र क्र. ८ व ९)
पार्श्व म्हणजे कूस किंवा बाजू.
पध्दती
१. ताडासनात उभे राहा (चित्र क्र.१). दीर्घ श्वास घ्या आणि उडी मारुन पाय बाजूंना फाकून पावलांमध्ये चार ते साडेचार फूट अंतर ठेवून उभे राहा. दोन्ही बाजूंनी हात उंचावून खांद्याच्या रेषेत आणा. तळहात जमिनीकडे वळलेले असू द्या. (चित्र क्र.३)
२. श्वास संथपणे बाहेर टाकीत उजवे पाऊल ९० अंशांनी उजवीकडे वळवा. डावे पाऊल थोडेसे उजवीकडे वळवा. डावा पाय लांब ताणलेला आणि गुडघ्याशी घट्ट आवललेला असू द्या. मांडी आणि पोटरी एकमेकांशी काटकोन करतील आणि उजवी मांडी जमिनीशी समांतर राहील अशा बेताने उजवा पाय गुडघ्यात वाकवा.
३. उजव्या पायाच्या कडेशी उजवा तळहात जमिनीशी टेकवा म्हणजे उजवी काख उजव्या गुडघ्याची बाहेरील बाजू झाकेल आणि त्यालगत राहील. डावा हात डाव्या कानाच्या वर लांबवा. डोके उंचावून ठेवा. (चित्र क्र. ८ व ९)
४. कुल्ले आवळून घ्या आणि गुडघ्यामागची धोंडशिर ताणा. छाती, पुठ्ठा आणि पाय हे एका रेषेत असू द्या. यासाठी छाती पुढे काढून वरुन मागे वळवा. शरीराच्या प्रत्येक अवयवाला ताण द्या. सबंध शरीराची मागची बाजू - विशेषत: पाठीचा कणा - ताणला जाऊ द्या; कण्याला ताण इतका द्या की, सर्व मणके आणि बरगडया हलल्या पाहिजेत आणि कातडी खेचली जात आहे असे वाटले पाहिजे.
५. या स्थितीत अर्धे ते एक मिनिट राहा. समतोल व दीर्घ श्वसने करीत राहा. श्वास घेऊन उजवा तळहात जमिनीवरुन उचला.
६. श्वास घ्या, उजवा पाय ताठ करा आणि क्र. १ मधील स्थितीप्रमाणे हात उचला.
७. श्वास सोडून क्र. २ ते ५ या स्थिती डाव्या बाजूने करा.
८. श्वास सोडा आणि उडी मारुन ताडासनात या. (चित्र क्र.१)
परिणाम
या आसनामुळे घोटे, गुडघे व मांडया सुदृढ बनतात. पोटर्या आणि मांडया यामधील विकृती नाहीशा होतात. छाती मजबूत होते. आणि कंबर व पुठ्ठा या ठिकाणचा मेद कमी होतो. तसेच सायटिका आणि संधिवात यांच्या वेदना कमी होतात. आतडयांचे कार्य या आसनामुळे सुधारते आणि मलोत्सर्ग सुलभतेने होऊ लागतो.
N/A
References : N/A
Last Updated : September 08, 2020
TOP