मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
द्विहस्त भुजासन *

द्विहस्त भुजासन *

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(चित्र क्र.३४५)
द्वि म्हणजे दोन; हस्त म्हणजे हात आणि भुज म्हणजे दंड. एकहस्त भुजासनाचा (चित्र क्र. ३४४) हा एक वेगळा प्रकार आहे.

पध्दती
१. पावलांमध्ये १८ इंच अंतर ठेवून उभे राहा.
२. गुडघे वाकवा आणि दोन्ही तळहात पायांच्या मध्ये जमिनीवर टेका.
३. उजवा पाय उजव्या दंडावरुन पलीकडे आणून उजव्या मांडीची मागची बाजू उजव्या दंडाच्या मागच्या बाजूवर टेका. त्याचप्रमाणे डावी मांडी डाव्या दंडावर टेका.
४. श्वास सोडा. पावले जमिनीवरुन उचला आणि हातांवर शरीराचा तोल सांभाळा. हात सरळ ताणा आणि पावले उंचावर एकत्र ठेवा. (चित्र क्र. ३४५)
५. नेहमीप्रमाणे श्वसन करीत या स्थितीत २० ते ३० सेकंद राहा.
६. श्वास सोडा. कोपरे वाकवा. शरीर खाली जमिनीवर आणा. पाय मोकळे करा. ते सरळ समोर पसरा आणि विसावा घ्या.

परिणाम
या आसनापासून एकहस्त भुजासनासारखेच फायदे मिळतात.

N/A

References : N/A
Last Updated : September 12, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP