बध्दहस्त शीर्षासन *
प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.
(चित्र क्र. १९८)
बध्द म्हणजे बांधलेला, पकडलेला किंवा आवरलेला. हस्त म्हणजे हात. हा शीर्षासनाचा एक प्रकार आहे.
पध्दती
१. सतरंजीची चौघडी करुन ती जमिनीवर पसरा आणि तिच्याजवळ गुडघे टेका.
२. छातीसमोर हातांची घडी घाला. आणि उजवा दंड कोपरापाशी डाव्या हाताने धरा. त्याचप्रमाणे डावा दंड उजव्या हाताने धरा.
३. कोपरे आणि घडी केलेले कोपरापासूनचे पुढले हात सतरंजीवर टेका. पुढे वाका आणि घडी केलेल्या हातांच्या पलीकडे लगतच सतरंजीवर टाळू टेका. कपाळ घडी केलेल्या हातांच्या पाठीमागे त्यांना लगटनूच असेल.
४. गुडघे जमिनीवरुन उचला आणि पाय सरळ ताठ पसरा.
५. शरीराचा भार डोके व कोपरे यांवर घ्या. कोपरापुढील हात जमिनीवर दाबा. श्वास सोडा. हातांची पकड सैल न करता अगदी हळूवारपणे धड किंचित पाठीमागे ढकला आणि पाय जमिनीपासून वर खेचा. (चित्र क्र. १९८)
६. पाय वर जाऊन जमिनीशी काटकोन करीत असताना शरीराचा भार मानेवर येतो. आणि मानेला ताण बसतो. मानेची मागची बाजू आणि कोपरापासूनचे पुढले हात यांना हलकेपणा जाणवेपर्यंत पाय वर नेत राहा अणि धडाचा मधला भाग पुढच्या दिशेने ताणा. अशा तर्हेने हलकेपणा जाणवू लागला की शरीर पूर्णपणाने सरळ उभे आहे असे निश्चित समजा. ज्यांना तोल सांभाळता येतो अशांसाठी सालंब शीर्षासन १ या आसनाची जी पध्दती दिली आहे तिच्यातील सूचनाप्रमाणे पुढच्या कृती करा.
७. या शीर्षासनामध्ये एक मिनिट राहा. नंतर श्वास सोडा. कोपरे न उचलता कंबर जरा मागे ओढा आणि अगदी हळूहळू पाय जमिनीवर आणा. पाय खाली आणताना अगदी सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. ते गुडघ्याशी वाकू देऊ नका.
N/A
References : N/A
Last Updated : September 10, 2020
TOP