मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
कुक्कुटासन *

कुक्कुटासन *

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(चित्र क्र. ११५)
कुक्कुट म्हणजे कोंबडा. हे आसन कोंबडयासारखे दिसते.

पध्दती
१. पद्मासनामध्ये बसा. (चित्र क्र. १०४)
२. मांडी आणि पोटरी यांच्या मध्ये असलेल्या पोकळीमध्ये गुढग्याजवळ हात शिरकवा. बोटांनी सुरुवात करुन हळू हळू कोपरापर्यंतचा हात पोकळीमधून पलीकडे जाऊ द्या.
३. श्वास सोडा. शरीर जमिनीवरुन उचला आणि आंगठे एकत्र जुळवून तळहातावर शरीर तोलून धरा. नेहमीसारखे श्वसन करीत शक्य तितका अधिक वेळ तोल सांभाळा. (चित्र क्र. ११५)
४. जमिनीवर टेकून विसावा घ्या. हात मोकळे करा. मांडी बदला आणि हे आसन पुन्हा करा.

परिणाम
या आसनामुळे मनगटे आणि पोटाचे पडदे सशक्त बनतात.

N/A

References : N/A
Last Updated : September 09, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP