एकपाद ऊर्ध्व धनुरासन *
प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.
(चित्र क्र.५०१ आणि ५०२)
एकपाद म्हणजे एक पाय. ऊर्ध्व म्हणजे वर. धनु म्हणजे धनुष्य.
पध्दती
१. ऊर्ध्व धनुरासन (चित्र क्र. ४८६) केल्यानंतर श्वास सोडा आणि उजवा पाय जमिनीवरुन उचला.
२. उजवा पाय सरळ लांब पसरा आणि तो जमिनीशी सुमारे ४५ अंश चा कोन करुन ठेवा (चित्र क्र.५००).
३. उजवा पाय जमिनीवरुन उचला आणि तो उजव्या मांडीवर ठेवा. (चित्र क्र. ५०१) आता शरीराचा तोल डावा पाय आणि डावा हात यांवर सावरला जाईल. नेहमीप्रमाणे श्वसन करीत या आसनात १० ते १५ सेकंद राहा.
४. श्वास सोडा. हात व उंच केलेला पाय खाली आणा आणि परत ऊर्ध्व धनुरासनामध्ये जा.
५. डावा पाय वर उचलून आणि डावा हात डाव्या मांडीवर ठेवून तसेच शरीराचा तोल उजवा हाअ व उजवा पाय यांवर सावरुन हे आसन पुन्हा करा. (चित्र क्र. ५०२) या बाजूकडील आसनाला आधीच्या इतकाच वेळ द्या.
परिणाम
ऊर्ध्व धनुरासनामुळे (चित्र क्र. ४८६) मिळणार्या फायद्याखेरीज या सुंदर आसनामुळे शरीराला तोलाची वाढती जाणीव लाभते आणि हालचालीमध्ये डौलदारपणा आणि सौष्ठव येते.
N/A
References : N/A
Last Updated : September 12, 2020
TOP