बुध्दासन *
प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.
(चित्र क्र. ३७३)
बुध्द म्हणजे ज्ञान प्राप्त झालेला. हे आसन म्हणजे स्कंदासनाचा (चित्र क्र. ३७२) पुढचा टप्पा.
पध्दती
१. स्कंदासनात (चित्र क्र. ३७२) डावा पाय मानेच्या पाठीमागे ठेवल्यानंतर श्वास घ्या आणि डोके व धड वर उचला.
२. डाव्या हाताने डावा घोटा धरा आणि तो पाय आणखी खाली आणा.
३. उजवा हात खांद्यापासून वर उचला. तो उजव्या बाजूस न्या आणि कोपरापासूनचा पुढला हात मागे वळवून तो डाव्या पावलावरुन डाव्या घोटयावर आणा. (चित्र क्र. ३७३)
४. दीर्घ श्वसन करीत या स्थितीत सुमारे १५ सेकंद राहा. श्वास घ्या व डोके आणि धड वर उचला.
N/A
References : N/A
Last Updated : September 12, 2020
TOP