सुप्त भेकासन **
प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.
(चित्र क्र. ४५८)
सुप्त म्हणजे निजलेला किंवा लेटलेला. भेक म्हणजे बेडूक. हे आसन भेकासनाच्या (चित्र क्र. १००) बरोबर उलट स्वरुपाचे आहे.
पध्दती
१. वीरासनामध्ये बसा. (चित्र क्र. ८९)
२. तळहात वर करुन हाताचे पंजे त्या-त्या बाजूच्या पावलाखाली सरकवा. पाय जमिनीवरुन वर ढकला आणि जमिनीवर रेला. काही वेळा श्वास घ्या.
३. श्वास सोडा. ढुंगण जमिनीवरुन उचला. (चित्र क्र. ४५७) मांडया जमिनीवरुन उचला आणि डोक्याची टाळू जमिनीवर टेकून धडाची कमान करा. (चित्र क्र. ४५८)
४. शरीराचा भार टाळू, कोपरे आणि गुडघे यांवर तोलला जाईल. कोपरापासूनचे पुढले हात जमिनीशी काटकोनात असतील. पंजे करंगळ्यापाशी पायाची बाहेरची बाजू पकडतील. पायाची बोटे कंबरेच्या पातळीला आणण्याचा प्रयत्न करा.
५. नेहमीप्रमाणे श्वसन करीत या स्थितीत २० ते ३० सेकंद राहा.
६. डोके जमिनीवरुन उचला. आणि पाय सुप्त वीरासनामध्ये (चित्र क्र.९६) येतील अशा तर्हेने पावलांवरुन हात उचला.
७. वीरासनामध्ये उठून बसा. पाय ताठ करा आणि विसावा घ्या.
परिणाम
या आसनामुळे पाठीचा कणा सुदृढ बनतो. गुडघे, घोटे, कंबर आणि मान यामध्ये रक्तप्रवाह चांगल्या तर्हेने सुरु होतो आणि पाठदुखी नाहीशी होते. गुडघ्याच्या सांध्यामध्ये काही अंतर्गत विकृती आली असल्यास ती नाहीशी होते. पावलांवर हातांचा जो दाब येतो त्यामुळे पावलांना आलेला बाक किंवा सपाटपणा या विकृती बर्या होतात. हे आसन नियमितपणे केल्यामुळे पायाच्या स्नायूचा सुकलेपणा व इतर दोष बरे होतात. फुप्फुसे पूर्णपणे विस्तारली जातात आणि पोटातील अवयवांना लाभ होतो.
N/A
References : N/A
Last Updated : September 12, 2020
TOP