मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
सेतुबंध सर्वांगासन किंवा उत्तान मयूरासन *

सेतुबंध सर्वांगासन किंवा उत्तान मयूरासन *

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(चित्र क्र. २५९)
सेतू म्हणजे पूल आणि सेतुबंध म्हणजे पुलाची बांधणी किंवा रचना. या आसनात शरीराची कमान बनते आणि तिला खांदे, चवडे आणि टाचा यांचा आधार असतो. कंबरेजवळ या कमानीला हातांचा आधार दिला जातो. उत् म्हणजे तीव्र आणि तान म्हणजे ताणणे. हे आसन ताणलेल्या मोरासारखे दिसते, म्हणून उत्तान मयूरासन हे नाव दिले गेले आहे.

पध्दती
१. सालंब सर्वांगासन (चित्र क्र. २२३) करा.
२. तळहात पाठीवर चांगले टेकवून पाठीचा कणा वर उचला. पाय सरळ ठेवून मागे घ्या. (चित्र क्र. २५६) किंवा गुडघे वाकवा. (चित्र क्र. २५७) आणि मनगटांवरुन पलिकडे पाय जमिनीवर न्या. (चित्र क्र. २५८) पाय लांबवा आणि ते एकत्र ठेवा. (चित्र क्र. २५९)
३. आता सबंध शरीराचा एक पूल बनतो. या पुलाचे वजन कोपरे आणि मनगटे यांवर पेलले जाते. जमिनीला स्पर्श करणारे शरीराचे अवयव डोक्याची आणि मानेची मागची बाजू, खांदे, कोपरे आणि पावले एवढेच असतात. या स्थितीत नेहमीप्रमाणे श्वसन करीत अर्धे ते एक मिनिट राहा.
४. पाठीचा कणा मानेच्या दिशेला खेचून आणि टाचा जमिनीवर घट्ट टेकून कोपरे व मनगटे यांच्यावरील दबाव कमी करणे शक्य असते.

N/A

References : N/A
Last Updated : September 11, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP