चक्रबंधासन **
प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.
(चित्र क्र.५२४)
चक्र म्हणजे नाडीकेंद्र किंवा नाडी-जाल. शरीराच्या यंत्राची ही जणू गतिचक्रेच आहेत. बंध म्हणजे दावे किंवा बेडी. चक्रे म्हणजे पाठीच्या कण्यामध्ये जेथे नाडया परस्परास मिळतात किंवा छेदतात असे विभाग. मानवी शरीरात अशी सात चक्रे आहेत :
(१) मूलाधार चक्र [जननेंद्रियावरील केंद्र];
(२) स्वाधिष्ठान चक्र [ओटीपोटाजवळील केंद्र];
(३) मणिपूरक चक्र [नाभीजवळचे केंद्र];
(४) अनाहत चक्र [हृदयानजीकचे केंद्र];
(५) विशुध्द चक्र [घशातील चक्र];
(६) आज्ञाचक्र [दोन भिवयांमधील चक्र]; आणि
(७) सहस्त्रार चक्र [सहस्त्रदल कमल; मेंदूच्या वरच्या भागातील केंद्र];
ही चक्रे सूक्ष्म असतात‘ आणि ती सहजपणे ओळखू येत नाहीत. वेगवेगळ्या जालांशी त्यांची तुलना केली जात असली तरी केवळ जाले म्हणजेच पूर्णपणे चक्र असे गृहीत धरणे योग्य ठरणार नाही.
पध्दती
१. द्विपाद विपरीत दंडासन करा. [चित्र क्र.५१६)
२. श्वास सोडून दोन्ही पावले डोक्याकडे न्या.
३. बोटे मोकळी सोडा. मनगटे पसरा आणि कोपरांपुढील हात जमिनीवर ठेवा. बोटे पावलांच्या दिशेला ठेवा. दोनदा श्वास घ्या.
४. श्वास सोडून डोके जमिनीवरुन उचला. मान पायांकडे लांबवून दोन्ही पावले हातांच्या नजीक आणा.
५. उजव्या हाताने उजवा घोटा पकडा, डावा घोटा डाव्या हाताने पकडा आणि पावले जमिनीवर टेका. दोनदा श्वास घ्या.
६. घोटे घट्ट पकडा आणि श्वास सोडून पावले व कोपरे जमिनीवर रोवा. खांदे व मांडया ताणून धडाची कमान करा. (चित्र क्र.५२४)
७. या स्थितीत १० ते १५ सेकंद राहा. श्वास जलद होत राहील.
८. घोटयांवरील पकड सोडा. टाळू जमिनीवर टेका आणि डोक्याच्या मागे बोटे एकमेकांत गुंफा. आता श्वास सोडून पायास झोका देऊन ते सालंब शीर्षासन १ (चित्र क्र.१९०) मध्ये न्या. नंतर ते खाली जमिनीवर न्या आणि विसावा घ्या किंवा ऊर्ध्व धनुरासन (चित्र क्र.४८६) करा किंवा विपरीत चक्रासन (चित्र क्र.४८८ ते ४९९) करा किंवा ताडासनात उभे राहा.
परिणाम
सर्व चक्रांत चैतन्य येते. या आसनामुळे मूत्रस्थ ग्रंथीचे कार्य निकोपपणे होऊ लागते. गुद, मूत्रपिंड, मान आणि डोळ्यांचे स्नायू यांना व्यायाम घडतो.
N/A
References : N/A
Last Updated : September 12, 2020
TOP