बंध आणि क्रिया - उड्डियानबंध *
‘योग’ हा शब्द संस्कृत भाषेतील ‘युज्’ या धातूपासून बनलेला आहे.
(चित्र क्र.५९३ आणि ५९४)
उड्डियन म्हणजे वर उडणे. काटेकोरपणे पाहिल्यास हे ‘आसन’ नसून ‘बंध’ म्हणजे बंधन आहे. ज्याप्रमाणे कंडेन्सर, फ्यूज आणि स्विच ही विजेच्या प्रवाहाचे नियंत्रण करतात, त्याप्रमाणे बंध हे प्राणाच्या-शक्तीच्या प्रवाहाचे नियंत्रण करतात. या बंधामध्ये प्राण किंवा शक्ती पोटाच्या खालच्या भागाकडून डोक्याकडे लोटली जाते बंध आणि प्राण याविषयीच्या तपशीलवार चर्चेसाठी प्राणायामावरील तिसरा भाग पाहा.
पध्दती
१. ताडासनात उभे राहा. (चित्र क्र.१)
२. पावले एक फूट अंतराने ठेवा.
३. गुडघे किचित पुढे वाकवून जरा पुढे झुका. बोटे पूर्णपणे पसरुन हात मांडयांच्या मध्यावर ठेवा.
४. गळपट्टीच्या हाडांमध्ये, उरोस्थीवरील खोबणीत हनुवटी रोवली जाईतो हात खाली न्या.
५. दीर्घ श्वास घ्या आणि श्वास झटकन बाहेर टाका, म्हणजे फुफ्फुसांमधील सर्व हवा जोराने बाहेर ढकलली जाईल.
६. श्वास आत न घेता तो बाहेर रोधून धरा. पोटाचा सर्व भाग खपाटीला न्या. हात मांडयांवर दाबून पोटाचा भाग आकुंचित करुन तो वर छातीच्या हाडाकडे न्या. (चित्र क्र.५९३)
७. पोटावरील पकड कायम ठेवून हात मांडयांवरुन उचला व ते पुठ्ठयावर ठेवा.
८. पोटावरील पकड सैल न करता व छातीच्या हाडावरील हनुवटी न उचलता दोन्ही पाय व पाठ ताठ करा. (चित्र क्र.५९४)
९. पोटाचे स्नायू सैल सोडा, पण हनुवटी व डोके हालवू नका; ते जर हालले तर हृदयाजवळ त्याचा ताण ताबडतोब जाणवेल.
१०. श्वास सावकाश आणि खोल घ्या.
११. क्र. ६ ते ९ या स्थितीमध्ये एकदाही श्वास आत घेऊ नका. हा बंध तुमच्या सहनशक्तीप्रमाणे करा, पण ५ ते १० सेकंदापेक्षा अधिक वेळ करु नका.
१२. काही वेळा श्वास घ्या आणि परिच्छेद १ ते १० पर्यंतच्या कृती पुन्हा करा. मात्र हा बंध २४ तासात अखंडपणे सहा ते आठ वेळांपेक्षा अधिक वेळ करु नये. अनुभवी गुरुच्या वैयक्तिक देखरेखीखाली फक्त बंधाचा वेळ वाढवीत न्यावा किंवा आवर्तनांची संख्या वाढवावी.
१३. ही आवर्तने सलगपणे दिवसातून एकदाच करावीत.
१४. मूत्राशय व मलाशय मोकळे केल्यावर रिकाम्या पोटावर या बंधाचा सराव करावा.
१५. उड्डियानबंध प्रथम उभ्याने शिकावा. नंतर प्राणायामाच्या साधनेचा प्राथमिक टप्पा म्हणून तो बसून करावा.
१६. तिसर्या विभागात दिलेल्या प्राणायामाच्या विविध प्रकारांमध्ये रेचक (श्वास सोडणे) व कुंभक (श्वास कोंडून धरणे) करताना हा बंध करावा.
परिणाम
या बंधामुळे पोटातील अवयव सुधारतात, जठराग्नी प्रदीप्त होत व पचनमार्गातील विषद्रव्ये नाहीशी होतात.
N/A
References : N/A
Last Updated : September 12, 2020
TOP